MB NEWS-अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांच्या मोर्चाची पंकजाताई मुंडेंकडून दखल

 अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांच्या मोर्चाची पंकजाताई मुंडेंकडून दखल



संजय बियाणी यांच्या हल्लेखोरांना तातडीने अटक करा- पंकजा मुंडे 


अंबाजोगाई ।दिनांक ०८।

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या हत्या करून फरार होणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून व्यापारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. संतप्त जनभावना लक्षात घेऊन कारवाई करा असेही त्यांनी म्हटले आहे.

Click: *Live Ambajogai -भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे भाषण*

   बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल परळी येथे आणि आज अंबाजोगाईत व्यापारी वर्गाने मोर्चा काढून सरकारला निवेदन दिले. आज अंबाजोगाई येथे या मोर्चाची दखल घेत पंकजाताई मुंडे यांनी ही मागणी केली. बियाणी यांची हत्येने क्रौर्याची परिसिमा गाठली असल्याचे त्या म्हणाल्या.

 राज्यात कायदा व सुव्यवस्था गुन्हेगारांनी धाब्यावर बसवली आहे, त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. बियाणी यांच्या हत्येने समस्त व्यापारी वर्ग संतापला असून आपल्या भावनांना मोर्चाद्वारे वाट मोकळी करून देत आहे. पोलिसांना अजुनही हल्लेखोर सापडले नाहीत ही शरमेची बाब आहे. सरकारने या संतप्त जनभावना लक्षात घेऊन हल्लेखोरांना तातडीने अटक करून   कडक कारवाई करावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

Click;*अंबाजोगाईतील ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मेळाव्यातील पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !