MB NEWS-ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल मानले आभार

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंकजाताई मुंडेंनी घेतली भेट


ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला यश  मिळाल्याबद्दल मानले आभार


मुंबई  ।दिनांक २१।

राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा यशस्वी करत ओबीसींना पूर्ववत आरक्षण बहाल केल्याबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची आज भेट घेऊन आभार मानले.


   राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची बाजू चांगल्या प्रकारे लावून धरल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण पुन्हा बहाल केले. हा निर्णय सर्व ओबीसी बांधवांसाठी आनंदाचा क्षण आहे. या निर्णयाबद्दल आभार मानण्यासाठी  पंकजाताई मुंडे यांनी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी माजी मंत्री संदीपान भूमरे, दादा भुसे, प्रकाश अण्णा शेंडगे,   देविदास राठोड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंकजाताईंच्या उपस्थितीत ओबीसी नेते व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचा आनंद व्यक्त केला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार