युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-चंद्रया रामकिस्टू आईटवार यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

 चंद्रया रामकिस्टू आईटवार यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सर्व परिचित चंद्रया रामकिस्टू आईटवार यांना नुकतीच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पत्र नुकतेच बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जारी केले आहे. या बढतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.     

          सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले चंद्रया आईटवार हे गेल्या अनेक वर्षापासून पोलीस दलात सेवा बजावत आहेत.आपल्या सेवा काळात त्यांनी विविध घटनांमध्ये तपास व तत्पर कर्तव्य बजावलेले आहे. त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना देण्यात येणाऱ्या श्रेणीवाढ बढतीमध्ये त्यांची श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ही निवड झाल्याबद्दल संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चाटे व व सहकारी कर्मचारी, मित्र यांनी त्यांचा हृदय सत्कार केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या