युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 *नागापूरचा ट्रान्सफॉर्मर दोन दिवसात बसविणार!*

*पंकजाताई मुंडेंची वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना ; परिसरातील शेतकऱ्यांनी मांडली होती व्यथा*


परळी ।दिनांक ३१। 

नागापूर येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मर येत्या दोन दिवसांत बसविण्यात येणार असून परिसरातील शेतकरी व वीज ग्राहकांची समस्या दूर होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी वीज अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन  ट्रान्स्फॉर्मर त्वरित बसविण्यास सांगितले आहे.  


 तालुक्यातील नागापूर वीज  उपकेंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर गेल्या दीड महिन्यांपासून  दुरुस्ती विना बंद आहे तर दुसरा जळाल्यामुळे बंद आहे, त्यामुळे नागापूर सह परिसरातील बहादूरवाडी, डाबी, दौनापूर, वानटाकळी ,अस्वलंबा, मांडखेल, नागपिंपरी, तडोळी, माळहिवरा, गोपाळपूर, आदी गावातील शेतकरी वीजेविना त्रस्त आहेत.सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके वाळत  आहेत. वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे परिणामी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शेतामध्ये ऊस, सोयाबीन, कापूस, हरभरा, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी आदी पिके असून पाण्याविना त्याचे अतोनात नुकसान होत आहे.


*शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा*

----------------

यासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांचेकडे तक्रार करताच त्यांनी वीज वितरणचे मुख्य अभियंता लातूर व बीडच्या अधीक्षक अभियंत्यांना  सूचना करून ताबडतोब ट्रान्स्फॉर्मर बसविण्यास सांगितले. पुढील दोन दिवसात हा ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी पंकजाताईंना दिला आहे. लवकरच ही समस्या दूर होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या