इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळीत राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानास पुन्हा सुरुवात* *रविवारी धनंजय मुंडे देणार प्रभाग क्र. 3 मध्ये गृहभेटी*

 *धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळीत राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानास पुन्हा सुरुवात*



*रविवारी धनंजय मुंडे देणार प्रभाग क्र. 3 मध्ये गृहभेटी*


परळी (प्रतिनिधी) - परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या 'राष्ट्रवादी आपल्या दारी, विकासाची प्रभागफेरी' या अभियानास रविवारपासून पुन्हा सुरुवात होत असून, धनंजय मुंडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह शहरातील नवीन प्रभाग क्र. 3 मधील नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. 


धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या अभियानास परळी वासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. धनंजय मुंडे हे त्यांचे सहकारी, पदाधिकारी व स्थानिक प्रशासकीय कर्मऱ्यांसह घरोघरी होऊन नागरिकांशी संवाद साधतात, यावेळी नागरिकांच्या लहान मोठ्या समस्यांना घरपोच व्यासपीठ मिळत असल्याने ही प्रभाग फेरी लोकप्रिय ठरत आहे. 


मध्यंतरी घोषित झालेली आचारसंहिता व संततधार पाऊस यामुळे या अभियानास काही काळ खंड पडला होता, मात्र रविवार (दि. 7) पासून पुन्हा या अभियानास सुरुवात होत असून, सकाळी 8 वा. सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.


--------------------------------------------------------

- video news-



--------------------------------------------------------

Video News :


-------------------------------------------------------

Video News :



-------------------------------------------------------

Video News :


-------------------------------------------------------

------------------------------------------------------










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या