युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ११३ दात्यांचे रक्तदान !*

 माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ११३ दात्यांचे रक्तदान !

🕳️ * _रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग; अनेेकांनी स्वयंस्फूर्त केलं रक्तदान_*



परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......


     ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आज (दि.११) रोजी आयोजित रक्तदान शिबिराला  दरवर्षी प्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या  शिबिरात तब्बल ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


       राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी या शिबिराचा शुभारंभ डाॅ.जे.जे. देशपांडे, डाॅ.सुरेश चौधरी,बाळासाहेब देशमुख,भालचंद्र तांदळे, नारायणदेव गोपनपाळे, श्रीकांत मांडे, ओमप्रकाश भुतडा,वासुदेव पाठक, रघुनाथराव कावरे,वैजनाथ बागवाले, अनंत ईंगळे, अनिल आष्टेकर,गोविंद कुकर, महाविर संघई, जयराज देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. हे रक्तदान शिबिर परळीत गावभागाची एक परंपरा बनली आहे.          

       दरवर्षी वाढदिवसानिमित्त  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या 10 वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारा व मोठ्या सहभागाचे शिबीर म्हणून हा सामाजिक उपक्रम परळीत अग्रेसर ठरलेला आहे.दर वर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम आहे. यावर्षीही या शिबिरात रक्तदात्यांची उत्स्फूर्तता मिळाली. 


      या शिबिरात तब्बल ११३रक्तदात्यांनी रक्तदान  केले.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळाने परिश्रम घेतले.

-------------------------------------------------------

विनंती:  MB NEWS  चे  युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खालील लिंकवर क्लिक करून बेल आयकाॅन दाबा.👇👇👇👇
-------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या