MB NEWS-परळी तालुक्यातील पाच शाळांना स्वच्छ शाळा पुरस्कार

 परळी तालुक्यातील पाच शाळांना स्वच्छ शाळा पुरस्कार



परळी( प्रतिनिधी.)  स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या केंद्र पुरस्कृत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये परळी तालुक्याचा डंका वाजला असून तालुक्यातील पाच शाळांनी स्वच्छ विद्यालय स्पर्धेत क्रमांक पटकाविला आहे. 

   राज्य भरातील  खाजगी तसेच इंग्रजी माध्यमाच्या आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे तपासणी करण्यात आली. स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या स्पर्धे अंतर्गत बीड जिल्ह्यातील एकूण 38 शाळांना विशेष पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये विशेष भाग म्हणजे एकूण जिल्ह्यातील 38 शाळा पैकी परळी तालुक्यातील पाच शाळांनी आपला ठसा उमटवला आहे.

   या पुरस्कार प्राप्त शाळांमध्ये परळी शहरातील ऐतिहासिक अशी  वैद्यनाथ विद्यालय, तसेच पोहनेर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, रमाई इंग्लिश स्कूल परळी, संत भगवान बाबा विद्यालय वाघाळा, आणि अपेक्षा इंग्लिश स्कूल शिरसाळा या शाळा पुरस्कार प्राप्त ठरलेल्या आहेत.  या शाळांनी पटकावलेल्या विशेष पुरस्कारामुळे बीड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये परळीचे नाव अग्रेसर ठरले आहे.

      परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय केंद्रे तसेच गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्गांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार