इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-●अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

 शेतकऱ्यांच्या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी आक्रोश आंदोलन

●अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

परळी / प्रतिनिधी


जून ,जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी व ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने जिल्ह्यातील 63 मंडळापैकी 16 मंडळात नुकसान भरपाई व पीक विमा कंपनीकडून 25 टक्के अग्रीम देण्यात येत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या निर्णयाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला असून या प्रश्नी बीड जिल्हा किसान सभेच्यावतीने शुक्रवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असून या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष एड.अजय बुरांडे यांनी केले आहे.


बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय सत्र या ही वर्षी थांबण्याचे चिन्ह दिसून येत नसून कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी नापिकी ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाचीला पुजली आहे.या परिस्थितीत देखील जून,जुलै महिन्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व लगेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड यामुळे शासनाकडून अंतरिम नुकसान भरपाई आणि पीक विम्याची 25 टक्के अग्रीम देण्यासाठी 63 पैकी केवळ 16 महसूल मंडळात नुकसान झाल्याचे सांगत उर्वरित बीड जिल्ह्यात काही ही नुकसान झाले नसल्याचे निकष लावून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.


शेतकऱ्यांमध्ये शासन व पीक विमा कंपनीच्या या अन्यायकारक निर्णयामुळे प्रचंड संताप निर्माण झाला असून समाज माध्यमातून यावर अनेक शेतकरी, शेतकरी पुत्र आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंतरिम नुकसान भरपाई द्यावी व 25 टक्के पीक विमा अग्रीम द्यावा या मागणीसाठी बीड जिल्हा किसान सभा शुक्रवार दि 16 रोजी मा.जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करून  या प्रश्नी शासन ,प्रशासन व पीक विमा कंपनीचे लक्ष्य वेधून घेणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष एड.अजय बुरांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय व हक्कासाठी मोठा संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

  1. काय ती अतिवृष्टी,
    काय ती पावसाची दडी,
    काय ते अनुदान,
    काय त्यो अग्रीम

    बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओके कार्यक्रम लावलाय


    #अग्रीम_द्या
    #अनुदान_द्या
    #नेत्यांचा_निषेध
    #शेतकरी_उसळणार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट