परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-मराठवाडातील विभागीय ओबीसी काँग्रेसच्या बीड येथील मंथन शिबिरात मंजूर केलेल्या ठरावा संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करणार . - वसंत मुंडे

मराठवाडातील विभागीय ओबीसी काँग्रेसच्या बीड येथील मंथन शिबिरात मंजूर केलेल्या ठरावा संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करणार . -  वसंत मुंडे      


     मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत बीड येथे ओबीसी काँग्रेसचा विभागीय मंथन शिबिराद्वारे ८ आक्टोंबर २०२२ ला विविध प्रकारचे अकरा ठराव मंजूर केलेले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रातील विभागीय स्तरीय मंथन शिबिर ओबीसीच्या विविध विषयावर मोर्चे, हल्लाबोल, भारत जोडो अभियान,महंगाई, बेरोजगारी, पेट्रोल डिझेल गॅसची भाव वाढ ,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोरगरीब जनतेचे प्रश्न घेऊन ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात मोर्चे काढून न्याय देण्याचा प्रयत्न केला आसुन देशातील सरकारी कंपन्या विकून देश चालवला जात आहे. महाराष्ट्रातील ईडी सरकार गुजरात साठी काम करीत आहे. लोकशाहीचे चारी स्तंभ केंद्र सरकारच्या हाती असून त्याचा गैरवापर केला जात आहे. संविधान वाचवण्यासाठी , सर्व सामान्य जनतेने भारत जोडा अभियानात सहभागी असे आव्हान ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे जनतेसाठी केले. रुपयाचे अवमूल्यन होत असुन महागाई वाढत आहे, मनोवादी भारतीय जनता पार्टीचे सरकार सर्वसी जबाबदार आहे. देशातील ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याची भाजपच्या सरकारचा खरा हेतू आहे. देशातील 26 सरकारी कंपन्याचे खाजगीकरण केले . समाजाला न्याय देता येत नसेल तर मंत्रीपदाचे त्याग करणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला त्याच प्रमाणे भारतीय जनता पार्टी जनहितासाठी निर्णय राबित नाही म्हणून नानाभाऊ पटोले यांनी भाजप सरकारच्या खासदारकीचा राजीनामा दिला हा आदर्श नेत्याकडून घेण्यासारखा आहे, म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागा मार्फत मंथन शिबिरामध्ये ठरावा द्वारे ओबीसीची स्वतंत्र जनगणना देशात झाली पाहिजे, ओबीसीची क्रीमीलेअर जाचक अट रद्द करण्यात यावी, एससी एसटी प्रमाणे घटना दुरुस्त करून ओबीसीला आरक्षण देण्यात यावे. ओबीसीच्या सर्व महामंडळामध्ये आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली असून बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे .जिल्हास्तरीय तालुकास्तरीय ओबीसी विद्यार्थ्यांना स्वतंत्र वस्तीग्रह तातडीने चालू करावी. देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपर घेण्यात यावेत.० ते २० विद्यार्थी कमी असलेल्या वाड्या तांड्यावरील शाळा चालू ठेवणे आवश्यक आहे. महा ज्योती या स्वायत संस्थेचे कार्यालय विभाग व जिल्हास्तरीय तात्काळ सुरू करण्यात यावीत असे ठराव मंजूर करण्यात आले असून शासन स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे पाठपूर्ण पाठपुरावा करणार. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास माळी माजी मंत्री अशोक पाटील कल्याण काळे नारायण मुंडे शिराजभाई देशमुख वसंत मुंडे राजेसाहेब देशमुख राजेंद्र राख शुभांगी शेरेकर कांचन चाटे विजय राऊत संभाजी जाधव रमेश सानप मंगल भुजबळ जी पी पाटील परवेज कुरेशी पांडुरंग कुंभार शहादेव हिंदोळे आदित्य पाटील रोहिदास देवडे अतिश पितळे तुकाराम साठे एकनाथ पाटील धनंजय राठोड गणेश राऊत राहुल सोनवणे इत्यादींनी या कार्यक्रमात सहभागी होते.  ‌‌       



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!