MB NEWS-✍️राजेंद्र लोढा, परळी वै.लिखित वाढदिवस विशेष लेख@@खा.डॉ. प्रितमताई मुंडे ः विकासाभिमूख नेतृत्व

  खा.डॉ. प्रितमताई मुंडे ः विकासाभिमूख नेतृत्व



खासदार प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी 2015 ला खासदार पदाची शपथ घेवून लोकसेवेचा वारसा चालू ठेवला. फेब्रुवारी 2015 च्या पहिल्याच अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये बीड जिल्हावासियांचा गेल्या 40 वर्षापासून रेंगाळत पडलेला परळी-बीड-नगर हा रेल्वे प्रकल्प करावा ही आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली. मोदी सरकारने गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याच अर्थ संकल्पात  एक हजार कोटींची भरीव तरतूद करून 2800 कोटीच्या या प्रकल्पास मान्यता देत हा प्रकल्प थेट  पंतप्रधानांच्या देखरेखी खाली असेल असे ही जाहीर केले. विकासाचा महाप्रोजेक्ट खासदार प्रितमताईंनी मंजूर करून घेतला.
 🔸 MB NEWS ला Youtube वर SUBSCRIBE नक्की करा.
तसेच शेतकर्‍यांचे विविध प्रश्न सभागृहात मांडले. युरियासारख्या रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडतो त्यापेक्षा पर्यावरणपुरक जमिनींची उत्पादन क्षमता वाढवणार्‍या सेंद्रीय खतांचा वापर केला जावा. सरकारने याबाबत उपाय योजना करावी ही मागणी संसदेत केली. महाराष्ट्र सरकार असताना बीड जिल्ह्यात अतिवृष्टी व दुष्काळ ही नैसर्गिक अपत्ती जिल्ह्यावर कोसळली असताना जिल्हाभर दौरा करून त्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून मा.ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी शेतकर्‍यांना मदत मिळवुन दिली. शेतकरी व शेतमजूराच्या मुलानांही आरक्षण देण्याबाबत सरकारकडे आग्रही मागणी संसदेत केली.


चारा टंचाई, शेती पीक व गुरांवर रोगराईचा परिणाम होऊ नये म्हणून त्यासाठी करावयाच्या उपाय योजना तसेच नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी हवामान खात्याने तंत्रशुध्द पध्दतीने अभ्यास करून त्याबाबत पुर्वसूचना देण्याबाबत ही सरकारला विनंती केली, ज्यामुळे शेतकर्‍यांना कांही प्रमाणात का होईना आपले नुकसान टाळता येईल. एवढेच नाही तर सांगली, कोल्हापूर या भागातील पूरग्रस्त बांधवांना अल्पशी मदत म्हणून परळी शहरामध्ये मदत फेरी काढून आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न ही खासदार प्रितमताई यांनी केला. ही मदत किती केली त्याही पेक्षा संवेदना महत्वाची.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नंतर देशात ओ.बी.सी. जनगणना व्हावी अशी आग्रही मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनीच सभागृहात केली. जो ओ.बी.सी. वर्गासाठी एक मोठा दिलासा आहे. ओबीसी आरक्षण प्रश्नावर त्या वारंवार संसदेत आवाज उठवत आहेत.
🔸आवर्जून बघा: डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेले वाढदिवसानिमित्त आवाहन
स्वतः डॉक्टर असल्या कारणामुळे आरोग्य सुविधा व अडचणी यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. सर्वंकष प्राथमिक उपचार या शासनाच्या धोरणानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हेल्थ वेलनेस क्लिनीक ही योजना दुष्काळाने वारंवार होरपळत असलेल्या  बीड जिल्ह्यासाठी व्हावी यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे आग्रही मागणी करून 253 वेलनेस क्लिनीकचा शासन मंजूरी आदेश मिळवला.
शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना, जन औषधी परी योजना, स्वास्थ्य महाराष्ट्र अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जननी सुरक्षा योजना यामध्ये बीड जिल्हा भाजप सरकारच्या काळात आघाडीवर राहिला आहे हे विशेष नमुद करावेसे वाटते.


🔸आवर्जून वाचा: संपादक ज्ञानोबा सुरवसे यांनी लिहिलेला वाढदिवस विशेष लेख.
भाजप सरकार असताना बीड जिल्ह्यात  जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे 200 कोटींची विकास कामे होऊन जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेचा चेहरा मोहरा बदलत आहे. मेडीकल कॉलेजच्या एम.बी.बी.एस.चा प्रवेश कोटा दुप्पट करण्यात पंकजाताई मुंंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांचे योगदान जिल्हा विसरणार नाही. भव्य महा आरोग्य शिबीर, अपंगांसाठी साधन सामुग्री असे नव नवे उपक्रम राबवुन खा.प्रितमताई आघाडीवर राहिल्या आहेत. आपल्या जिल्ह्याचे विकासाचे आरोग्य धन्वंतरी रुपी खासदारांमुळे निरोगी व सदृढ झाले आहे हे मात्र नक्की.
🔸 MB NEWS ला Youtube वर SUBSCRIBE नक्की करा.
हजारो कोटी रुपयांचे शेकडो किलीमिटरचे रस्ते जिल्हावासियांच्या दारी आले आहेत.  यामुळे बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलत आहे. पुढील काळात तो पुर्णपणे बदललेला असेल. उद्योगधंंंदा वाढ व पर्यायाने रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होण्यासाठी दळणवळणाच्या सोयी असणे अत्यंत आवश्यक आहे. परळी- बीड- नगर रेल्वे प्रकल्प व राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाल्यामुळे बीड हे देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसणार आहे. परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचे आष्टीपर्यंत काम पुर्ण झालेले असुन त्याची चाचणीपण खासदार डॉ. प्रितमताईंच्या उपस्थितीत झालेली आहे. या रेल्वे मार्गावर हायस्पीड रेल्वे चालु होवुन जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. औरंगाबाद, लातुर, सोलापूर, नगर या बाजारपेठाबरोबर बीड जिल्हाही विकसीत होतो आहे.

अशा या विकासाभिमुख खासदार प्रितमताईं यांचा फेम इंडिया व एशिया पोस्ट यांनी देशातील सर्वोत्तम 25 खासदारांची निवड केली त्यात प्रितमताई मुंडे यांचा समावेश झाला. अशा खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचा आज वाढदिवस, खासदार ताई अनावधानाने राजकारणात आल्या, डॉक्टर म्हणून जे.जे. हॉस्पिटल येथे डॉ. लहानेंच्या सोबत काम करत असताना पेशंट म्हणून येणारी जिल्ह्यातील माणसे त्यांना वाचायला मिळाली त्यांचे सुख, दुःख अपेक्षा याची जाण झाली. त्यांचा आज खुप मोठा फायदा त्यांना खासदार म्हणून काम करताना होतो आहे. अशा या कुटूंब वत्सल, संवेदनशील व कार्यकर्त्यांशी जिव्हाळा ठेवणार्‍या नेतृत्वाचा, दुखी वंचितांसाठी लढणार्‍या या नेतृत्वास वाढदिवसाच्या आम्हां सर्वांतर्फे मनापासून शुभेच्छा.
🔸 MB NEWS ला Youtube वर SUBSCRIBE नक्की करा.







✍️राजेंद्र लोढा, परळी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार