MB NEWS-बीड जिल्हयात मुलींच्या घटत्या जन्मदरावर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली तीव्र चिंता*

  *बीड जिल्हयात मुलींच्या घटत्या जन्मदरावर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली तीव्र चिंता*





*आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही*


*पुन्हा एकदा मुलींच्या जन्मासाठी प्रबोधन, जनजागृतीची सुरू करा*

🔸 MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.

बीड ।दिनांक १६।

बीड जिल्हयात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी होत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी च्या सदस्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुलींना नाकारले जात असल्याने जिल्हयात पूर्वीसारखीच स्थिती निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही असे सांगत मुलींचा जन्मदर पुन्हा वाढविण्यासाठी प्रबोधन, जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आवर्जून बघा: खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेले वाढदिवसानिमित्त चे आवाहन.

  पाटोदा तालुक्यात हजार मुलांमागे केवळ ७६४ मुलींचा जन्म झाला आहे. कोव्हिड काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचे पीसीपीएनडीटी च्या अशासकीय सदस्या डॉ.आशा मिरगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावर बोलतांना पंकजाताई मुंडे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

आवर्जून वाचा: संपादक ज्ञानोबा सुरवसे यांनी लिहिलेला वाढदिवस विशेष लेख.

   पंकजाताई म्हणाल्या, २००९ साली जेव्हा मी राजकारणात आले, तेव्हा जिल्हयात मुलींचा जन्मदर राज्यात सर्वात कमी होता. या गोष्टीविषयी मनात तीव्र दुःख बाळगून यावर एनजीओ च्या माध्यमातून मी खूप काम केलं. जेव्हा महिला बालविकास मंत्री आणि जिल्हयाची पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली तेव्हा मी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी पहिली योजना जाहीर केली आणि याचा चांगला परिणाम होऊन जिल्हयात मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ९६१ मुली असा झाला होता.  जन्मदराचे अत्यल्प प्रमाण ज्या ठिकाणाहून सुरू झाले, पुन्हा त्याच ठिकाणी  नेऊन ठेवण्याचे काम आताच्या कारभारामुळे होत आहे, याचा मी तीव्र निषेध आणि नापसंती व्यक्त करते. 

आवर्जून वाचा: राजेंद्र लोढा यांनी लिहिलेला खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त चा विशेष लेख.

*पुन्हा जनजागृती सुरू करा*

---------------

बीड जिल्हयात गेल्या दोन वर्षांत पीसीपीएनडीटी ॲक्टचे व्यवस्थित पालन न झाल्याने मुलींचा जन्मदर घटला असल्याचे यावरून दिसत आहे. याचा अर्थ मुलींना नाकारले जात आहे. कुठेतरी अशा घटना घडत आहेत आणि यावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही. जिल्हावासियांना मी आवाहन करते की, जसे आपण 'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजनेला खूप छान प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद पुन्हा  द्या. प्रबोधन, जनजागृतीमध्ये सर्वांनी सहभाग घ्या, जिल्हयाचे हे चित्र पुन्हा दिसू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा असे आवाहन केले.

* 🔸 MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !