प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS- *समाजोपयोगी उपक्रम राबवून खा डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस साजरा करणार-राजेश गिते *

 *समाजोपयोगी उपक्रम राबवून खा डॉ प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस साजरा करणार-राजेश गिते *



 परळी वैजनाथ-बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांचा वाढदिवस दि१७/०२/२०२२ रोजी आहे.सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोना चे संकट आहे अशा परिस्थितीत  माझा वाढदिवस साजरा करू नका,आतिशबाजी, आणि व्यर्थ खर्च करु नका अश सुचना खा डॉ प्रितमताई यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना केल्या आहेत.

🔸MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.

खा डॉ प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या सुचनेनुसार खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे नंदनंज तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे गुरुवार दि १७/०२/२०२२ रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण,समाजसेवा करणार्या व्यक्तिंचा सन्मान आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून खा डॉ प्रितमताई यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य जिल्हा परिषद बीड राजेश गिते यांनी दिली.

🏵️ आवर्जून बघा: खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेले वाढदिवसानिमित्त चे आवाहन.

🔸आवर्जून वाचा: संपादक ज्ञानोबा सुरवसे यांनी लिहिलेला वाढदिवस विशेष लेख.

           या कार्यक्रमास जेष्ठ नेते, पदाधिकारी, शक्ति केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजेश गिते आणि त्यांचे सहकारी पंचायत समिती सदस्य भरतराव सोनवणे,मा प समिती सदस्य मारोतराव फड,दादहारी वडगांव सरपंच बजरंग (दादा) कुकर, मांडवा सरपंच सुंदर मुंडे, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, मिरवट सरपंच धुराजी साबळे, लोणारवाडी सरपंच नवनाथ मुंडे,सेलु सरपंच गंगाराम सातपुते, युवा नेते पप्पु चव्हाण, कासारवाडी मा सरपंच दशरथ (दादा) गुट्टे,वैजवाडी मा सरपंच मधुकरराव  भांगे,लोणी मा सरपंच प्रल्हाद शिंदे,धारावती तांडा मा सरपंच भगवान पवार,कौठळी मा सरपंच भिमराव हाके,मिरवट सेवा सहकारी सोसायटी चेअरमन भरतराव इंगळे ,सारडगांव जेष्ठ नेते देहुराव आघाव, मरळवाडी भाजपा नेते माऊली आंधळे ( पाटील),बेलंबा जेष्ठ नेते दशरथ (भाऊ) गिते,दादाहारी वडगांव ग्राम पंचायत सदस्य सुदर्शन मुंडे,वसंतनगर तांडा युवा नेते संतोष राठोड, मलकापूर युवा नेते भास्कर गिते यांनी केले आहे. 

🔸आवर्जून वाचा: राजेंद्र लोढा यांनी लिहिलेला वाढदिवस विशेष लेख.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या