प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-राजमुद्रा प्रतिष्ठान प्रभाग क्रमांक पाच मार्फत नाविन्यपूर्ण पद्धतीने शिवजयंतीचा उपक्रम

  खेळ पैठणीचा आणि सुंदर माझे अंगण स्पर्धेचा शुभारंभ;पहिल्याच दिवशी महिलांचा प्रचंड प्रतिसाद  



राजमुद्रा प्रतिष्ठान प्रभाग क्रमांक पाच मार्फत नाविन्यपूर्ण पद्धतीने शिवजयंतीचा उपक्रम

परळी दि.

ज्यांचे नाव उच्चारताच अनेकांच्या मनात प्रेरणा निर्माण होते. त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कारकीर्दीमध्ये अनेक मापदंड आणि आदर्श घालून दिले. राजा कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज...यांच्या जन्मोत्सवा  निमित्ताने परळी शहरातील   प्रभाग 5 मधील नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.नगरसेवक गोपाळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली  आणि युवक नेते तथा राजमुद्रा प्रतिष्ठान चे प्रमुख किशोर जाधव यांच्या पुढाकारातून दि.१७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत या भागातील महिलांसाठी  खेळ पैठणीचा आणि सुंदर माझे आंगण अशा स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याचा शुभारंभ गुरूवार दि. १७ रोजी प्रभाग क्रमांक पाच मधील सौ.लक्ष्मी बाई टाक, सौ.संजीवनी क्षीरसागर, सौ.शोभा दौंड, सौ.विजयमाला चौरे, सौ.शहाणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  



खेळ पैठणी चा ही स्पर्धा दि.१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता ज्ञानबोधनी विद्यालय कृष्णा नगर येथे संपन्न झाली. स्पर्धेत या भागातील २५०  पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.काल झालेल्या खेळ पैठणी चा या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या सौ.रोहिणी काळे द्वितीय क्रमांक विजेत्या सौ.सिमा पाटील तर तृतीय विजेत्या सौ.श्रध्दा डाके या ठरल्या आहेत. विजेत्या मानकरी महिलांचा सत्कार नगरसेवक गोपाळ आंधळे आणि राजमुद्रा प्रतिष्ठान चे अध्यक्ष किशोर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.या सर्व विजेत्या महिलांचा बक्षीस विरण समारंभ, छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि न.प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांना सामाजिक कार्याबद्दल शिव गौरव पुरस्कार देऊन गौरव राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते  शनिवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता गंगासागर नगर येथे होणार आहे  कार्यक्रमांचे सुञसंचलन सौ.वैशाली रूईकर, अनिल सेवकराम जाधव सर यांनी केले. 

  तर दि.१८ फेब्रुवारी सुंदर माझे आंगण या स्पर्धेत अनेक महिलांनी आपल्या घराची सजावट करून घरासमोर नाविन्यपूर्ण व जनजागृती करणारी रांगोळ्या काढल्या.दोन्ही विभागातून प्रत्येक पहिले, दुसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. पहिले बक्षीस पैठणी साडी, दुसरे बक्षीस सोन्याची नथ आणि उत्तेजनार्थ प्रेशर कुकर असे ठेवण्यात आले आहे. पैठणी साडी साठी सौजन्य पेन्टेंवार कलेक्शन याचे असणार असूनसुंदर माझे आंगण ही मराठवाड्यातील प्रथमच नाविन्यपूर्ण स्पर्धा  होय.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष शाम आवाड, उपाध्यक्ष कृष्णा पौळ, सचिव गोविंद गरड, कार्याध्यक्ष शिवहरि जाधव, कोषाध्यक्ष गणेश भालेकर, प्रसिद्धी प्रमुख समर्थ हावा, अनंत आघाव,अशोक हिंगणे,  गणेश खाडे, शंकर बुंदिले, योगेश नाईकवाडे, बापु गिराम, विठ्ठल इंगळे,  सदस्य नितीन धर्मे, शिवराज वाकडे, विनोद बिरंगे,पप्पु पौळ,  दिपक खाडे, प्रशांत शिंदे, बालाजी सिरसाठ, नितीन पौळ, अशोक कापसे, वाघू गिराम, परमेश्वर बहादुरे, नवनाथ आघाव, मुंजा उबाळे, सोमनाथ उबाळे, किशोर कापसे, प्रशांत दराडे, गजानन थळकरी, बालाजी शिंदे, उमेश वाकडे आदी प्रयत्नशिल आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या