दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:दहावी-बारावी परीक्षार्थींसाठी आता नियमावली

 दहावी-बारावी परीक्षार्थींसाठी आता नियमावली




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीची लगबग आता वेगाने सुरु झाली आहे. या अनुषंगाने आता राज्य मंडळाने उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच काही नियम आखून दिले आहेत. ज्यात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जात असतांना प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहायचे असून, उत्तरपत्रिका किंवा पुरवणीचे कोणतेही पान फाडू नये. फाडल्यास परीक्षार्थी शिक्षकेस पात्र ठरले. असा नियम जारी केला आहे.


बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठीच्या उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या सूचना परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना दिल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रामध्ये 10:30 वाजेपर्यंत,तर दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी 2:30 वाजेपर्यंत परीक्षा कक्षात पोहचावे लागणार आहे.


गेल्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. त्यात शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी पंधरा मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ आदींचा समावेश होता. यंदा मात्र नियमित पद्धतीने परीक्षा होणार असल्याने या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बहुतांश विद्यार्थी हे दोन वर्षानंतर थेट दहावी तर काही थेट बारावीचीच परीक्षा देणार असल्याने उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरिता सूचना जारी करण्यात आल्या आहेत.


उत्तरपत्रिकेबाबत सूचना

परीक्षा दालनात परीक्षार्थ्यास पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांक याची खात्री करुन उपस्थिती पत्रकावर क्रमांक, बारकोड स्टिकर लिहून स्वाक्षरी करावी. स्टिकर काळजीपूर्वक दिलेल्या जागेवरच चिकटवावे, परीक्षार्थीने उत्तराचा काही भाग खोडल्यास शिवाय त्यात शाईत बदल करावा लागला, कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या,काळ्या शाईने रेघ मारली असेल अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नये, उत्तरपत्रिकेवर निळ्या अथवा काळ्या शाईचा वापर करावा अन्यथा मजकुरास गुणदान केले जाणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....