MB NEWS:दत्ताभाऊ देशमुख यांना मातृशोक:शांताबाई त्र्यंबकराव देशमुख यांचे दुःखद निधन

 दत्ताभाऊ देशमुख यांना मातृशोक:शांताबाई त्र्यंबकराव देशमुख यांचे दुःखद निधन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...

    येथील जुन्या गावभागातील गणेशपार विभाग देशमुख गल्ली येथील रहिवाशी श्रीमती शांताबाई त्र्यंबकराव देशमुख यांचे दिनांक 16 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी दुपारी 02 : 00 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 82 वर्षे होते. परळी नगरपालिकेचे माजी नगरसेवक दत्ताभाऊ देशमुख यांच्या त्या मातोश्री होत.

   श्रीमती शांताबाई देशमुख या अतिशय सुस्वभावी, मनमिळाऊ तथा धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुना, तीन मुली, नातवंडे,पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्यावर परळी वैजनाथ येथील देशमुख धाम या ठिकाणी काल सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.परळी नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा परळी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष दत्ताभाऊ त्र्यंबकराव देशमुख यांच्या त्या मातोश्री होत. देशमुख परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार