दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:पंकजा मुंडेंनी केले 'त्या' तीन युवकांच्या कुटुंबियांचे सांत्वन; भराडिया, धोकटे, कांदे परिवाराला दिला धीर

 पंकजा मुंडेंनी केले 'त्या' तीन युवकांच्या कुटुंबियांचे सांत्वन; भराडिया, धोकटे, कांदे परिवाराला दिला धीर



परळी वैजनाथ ।दिनांक १७। 
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी शहरात आल्या आल्या 'त्या' तीन युवकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. भराडिया, धोकटे व कांदे परिवाराच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.

शहरातील व्यंकटेश कांदे,रोहित भराडीया व शुभम धोकटे या तीन युवकांचा नुकत्याच झालेल्या एका रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज संध्याकाळी पंकजाताई शहरात आल्या,  स्वतःच्या घरी न जाता त्यांनी थेट त्या तीन युवकांचे घर गाठून त्यांचे आई, वडिल आणि परिवाराचे सांत्वन केले. आपल्या परळीतील ऐन उमेदीतल्या तरुणांचे असे जाणे व्यथित करणारे आहे, या दुःखातून तीनही परिवार अजून सावरलेला नाही, आपले दुःख खूप मोठे आहे अशा शब्दांत त्यांनी या युवकांच्या कुटुंबियांनी धीर दिला. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, किशोर केंद्रे, शाम तोष्णीवाल, राहूल केंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....