युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:योगेश वांजरखेडे यांना मातृशोक : सौ.शामलता वांजरखेडे यांचे निधन

 योगेश वांजरखेडे यांना मातृशोक : सौ.शामलता वांजरखेडे यांचे निधन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     येथील स्नेहनगर मधील रहिवासी योगेश वांजरखेडे यांच्या मातोश्री सौ. शामलता जगदीशराव वांजरखेडे यांचे आज दि.१५ रोजी सायंकाळी सहा वाजता निधन झाले. स्नेहनगर मधील रहिवासी असलेल्या शामलता जगदीशराव वांजरखेडे या अतिशय सुस्वाभावी म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

उद्या अंत्यसंस्कार

     दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 16 रोजी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वांजरखेडे यांचे राहते घर पावर हाऊस समोर परळी वैजनाथ येथून अंत्ययात्रा निघणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या