युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी होणार-प्रा.अतुल दुबे

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार-प्रा.अतुल दुबे




परळी/प्रतिनिधी 

जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मीक कार्यक्रमांनी साजरी होणार असल्याची माहिती जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा युवा सेनेचे समन्वयक प्रा.अतुल दुबे यांनी दिली आहे.

आज बुधवार दि.1 मार्च रोजी जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणच्या संपर्क कार्यालयात शिवसेना, युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची शिवजयंती निमित्त बैठक जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर   यांच्या अध्यक्षतेखाली व जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा युवा सेनेचे समन्वयक प्रा.अतुल दुबे  यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

शुक्रवार दि.10 मार्च रोजी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोेंढा मार्केट येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मीक उपक्रमांनी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  

या बैठकीस जेष्ठ नेते सतिश जगताप, शिवसेना शहर संघटक संजय कुकडे, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर युवा प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन बुंदेले, बबन ढेंबरे, अमित कचरे,सचिन लोढा, बजरंग औटी,मनिष जोशी,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे,विजय पवार,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार, विकास देवकर, सुधाकर बारसकार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या