युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:माणिकनगर महिला भजनी मंडळ व श्री महारुद्र संस्थानचा उपक्रम

 पापमोचनी एकादशीनिमित्त परळीत श्री नामाचा गजर करत  निघाली वारकऱ्यांची पायी दिंडी



माणिकनगर महिला भजनी मंडळ व श्री महारुद्र संस्थानचा उपक्रम


*परळी वैजनाथ /प्रतिनिधी*


हिंदू संस्कृतीत होळी नंतर येणाऱ्या मराठी महिन्यातील शेवटची पापमोचणी एकादशीला अनन्य साधारण महत्व असून यानिमित्त परळी वैजनाथ येथील माणिकनगर भागातील श्री महारुद्र संस्थान व माणिक नगर भजनी मंडळ यांच्या वतीने श्री नामाचा गजर करीत आज शनिवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी पाच वाजता प्रभु वैद्यनाथास मेरू प्रदक्षिणा करत वारकऱ्यांनी पायी दिंडी काढली.

फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षात आज शनिवारी १८ मार्च रोजी पापमोचनी एकादशी आहे. होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य महत्त्व आहे. मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन असून, या वर्षातील ही शेवटची एकादशी असून या निमित्त शहरातील माणिक नगर भागातील श्री महारुद्र संस्थान हनुमान मंदिर व माणिक नगर महिला भजनी मंडळ यांच्या वतीने आज सकाळी पाच वाजता संत श्री जगमित्र नागा महाराज मंदिर, श्री प्रभू वैजनाथ मंदिर, दक्षिणमुखी गणपती मंदिर, प्रति वैजनाथ मंदिर, वेताळ मंदिर असे मार्गक्रमण मेरू प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी माणिक नगर भागातील महिला भजनी मंडळ तसेच भाविक भक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या