MB NEWS:प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार

 वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा "प्रसाद" योजनेत समावेशाचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार

पंकजाताई मुंडे यांनी मानले राज्य सरकारचे आभार

मुंबई  ।दिनांक १४।

केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी "प्रसाद" योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्याच्या   पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या घोषणेचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले असून राज्य सरकारचे आभार मानले आहेत.   


केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी सुरू केलेल्या प्रसाद योजनेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करून या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येईल असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतेच सभागृहात सांगितले होते. दरम्यान  आम्ही सातत्याने करत असलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार