MB NEWS:कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान

 सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा गौरव


 कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान




साहित्यिक जैमिनी कडू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रमात गौरव 



 परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नागपूर विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा विशेष गौरव करण्यात आले. साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत जैमिनी कडू यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


 महात्मा फुले शिक्षण संस्था, ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्था व समृतीशेष जैमिनी कडू मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


 कामगारांसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण व विशेष कार्याची दखल घेऊन नंदलाल राठोड यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या सत्कारबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे.

 कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे , केंद्र संचालक आरेफ शेख, शंकर काशीद, योगेश जोशी, नितीन पाटील, विजय वायाळ, उमेश जगदाळे, सलीम पठाण यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार