इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:सामाजीक संदेश देत राबवला उपक्रम

 'एप्रिल फुल' नको - 'परळी कुल' हवी !



सामाजीक संदेश देत राबवला  उपक्रम 


परळी (प्रतिनिधी)

 एक एप्रिल सर्वत्र एकमेकांना मुर्ख बनवण्याचा दिवस सर्वजण साजरा करत असताना परळीतील सामाजीक कार्यकर्त्यांनी एप्रिल फुल नको तर हवी परळी कुल असा सामाजीक संदेश देत उपक्रम राबविला.यावेळी वृक्षांना पाणी घालुन सर्वांनी प्रदूषणामुळे उन्हाळ्यात अतिउष्ण होत असलेल्या परळीला थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

 एक एप्रिल हा एकमेकांना मुर्ख बनवण्याचा दिवस.उन्हाची तिव्रताही याच महिन्यात वाढते.प्रत्येकजण एकमेकास एप्रिल फुल बनवण्यास सतर्क असताना परळीतील सामाजीक कार्यकर्त्यांनी एकत्र येत परळी शहराला भेडसावणार्या प्रदूषणामुळे इतर शहरांच्या तुलनेत परळी हे अधिक उष्ण व प्रदुषीत असते.शहर परिसरात वृक्षारोपण लागवड करुन जोपासणा करावी,हरित परळी होण्यासाठी योजना राबवावी यासाठी एप्रिल फुल नको तर हवी परळी कुल असा संदेश देत शहरातील वृक्षांना लागवडीनंतर पाणी मिळालेले नाही अशा वृक्षांना पाणी देत परळी कुल चा संदेश दिला.यावेळी सामाजीक कार्यकर्ते अश्विन मोगरकर,शिक्षक शिवप्रसाद राजनाळे,व्यापारी यशवंत चव्हाण,गोविंद चांडक,पत्रकार मोहन व्हावळे,धनंजय आढाव,संभाजी मुंडे,सजीब रॉय,स्वानंद पाटिल,श्रीराम लांडगे,महादेव शिंदे,नानासाहेब जाधव आदी उपस्थित होते.परळीतील सामाजीक कार्यकर्त्यांनी अनोखा संदेश देत केलेल्या या उपक्रमाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे.परळी शहरातील नागरीक प्रदुषण व उष्णतेचा त्रास सातत्याने सहन करत आहेत.यास वृक्षतोड हे प्रमुख कारण आहे.अनेकजण वृक्षलागवड करतात परंतु त्याची जोपासणा होत नाही.एप्रिल फुल नको तर हवी परळी कुल यानिमित्ताने शहरातील गणेशपार भागात लागवड केलेल्या वृक्षांची या उन्हाळ्यात जोपासणा करत हरित परळीसाठी जनजागृती करणार असल्याचे सामाजीक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी यावेळी सांगितले.







Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या