वीरशैव लिंगायत समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा- उमाकांत पोपडे



परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

बारा ज्योतिर्लिंगा पैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ नगरीत 7 जानेवारी 2024 रोजी संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधु वर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उमाकांत पोपडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मागील अनेक वर्षांपासून, शहरात पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने, वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे  व वीरशैव समाज परळी यांच्या प्रेरणेने, शहरात राज्यस्तरीय भव्यदिव्य वधू वर पालक परिचय मेळावा भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. यावर्षीही 7 जानेवारी 2024 रविवारी सकाळी 10 वाजता गुरूलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे हा मेळावा होणार असून या वधु वर परिचय मेळाव्यास सर्व वधूवरांनी आपली नाव नोंदणी करावी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उमाकांत पोपडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार