इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 8 जानेवारी रोजी बांधकाम कामगारांचा परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा -प्रा.बी.जी. खाडे




परळी वैजनाथ: परळी तालुक्यातील बांधकाम कामगारांचा परळी येथे  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे उपकार्यालय सुरू करावे या प्रमुख मागणीसह इतर न्याय मागण्यांसाठी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर 8 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. असे पत्रकाव्दारे बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.जी. खाडे यांनी कळवले आहे.

         परळी येथील बांधकाम कामगारांना  कागदपत्र पडताळणीसाठी बीड येथील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयात जावे लागते. बीड परळीपासून 100 किमी असल्यामुळे कामगारांचा पूर्ण दिवस जातो. 100 किमी दुर व किमान 500 रु.खर्च होतो. बांधकाम कामगारांचा वेळ वाचावा व खर्चही वाचावा म्हणून परळीला तसेच प्रत्येक तालुक्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ उपकार्यालय सुरू करावे अशी संघटनेची मागणी  आहे.ग्रामविकास मंत्रालयाचे जी आर, कामगार आयुक्त कार्यालयाचे जी आर व बीड येथील मुख्यकार्यकारी अधिकारी (सीइओ) चे सर्व ग्राम सेवकांना आदेश असूनही  अनेक ग्रामसेवक बांधकाम कामगारांना मात्र नोंदणीसाठी मागील वर्षी ९० (नव्वद) दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देत नाहीत. 26 सप्टेंबर 2023 रोजी मुख्य कार्यकारी अभिकारी यांनी बीड जिल्ह‌यातील सर्व ग्रामसेवकांना आदेश काढलेले आहेत. परळी तालुक्यातील ग्रामसेवक प्रमाणपत्र देत आहेत परंतु काही ग्रामसेवक जाणीवपूर्वक  देत नाहीत. अशा ग्रामसेवकांना निलंबित करावे अशी संघटनेची मागणी आहे. 

         शहरातील तीन इ -श्रमकार्ड धारकांचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे त्यांना मदत मिळावी म्हणून अर्ज भरून  एकवर्ष झाले तरी कामगारांच्या वारसांना लाभ मिळालेला नाही. वारसांना दोन लाख रूपये मिळाले पाहीजेत ही संघटनेची मागणी आहे.बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांनाच शिष्यवृत्ती मिळते मात्र काही बांधकाम कामगारांना दुसऱ्यांदा जुळे झाल्याने  मुलांची संख्या तीन झालेली आहे.अशा तीन मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. मेडिक्लेम योजना सुरू करा, भोजन, सुरक्षाकिट, भांडे संचऐवजी नगदी रक्कम कामगारांच्या खात्यात टाकावी. अशा विविध मागण्यांसाठी ८ जानेवारी रोजी परळी परिसरातील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने मोर्चात सामील व्हावे असे आवाहन बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा बी. जी. खाडे, सचीव जालींदर गिरी, शेख जावेद, संजय जाधव, बाबा रोडे व प्रकाश वाघमारे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या