इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : वाल्मीक अण्णा कराड यांच्या अध्यक्षतेखालील परळी विधानसभा समिती सदस्यपदी बाजीराव धर्माधिकारी व राजाभाऊ पौळ

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : वाल्मीक अण्णा कराड यांच्या अध्यक्षतेखालील परळी विधानसभा  समिती सदस्यपदी बाजीराव धर्माधिकारी व राजाभाऊ पौळ


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
      महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने प्रत्येक विधानसभानिहाय  समिती गठीत करण्यात आली आहे. परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीत आता बाजीराव धर्माधिकारी व राजाभाऊ पौळ या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.
           बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय समिती गठीत केली आहे. या अनुषंगाने परळी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र असलेल्या सनियंत्रण समिती अध्यक्षपदी यापुर्वीच वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
              या समितीत न.प. मुख्याधिकारी, पं.स. गटविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, महिला व बालविकास अधिकारी  पर्यवेक्षिका महिला व बालकल्याण विभाग, तालुका संरक्षण अधिकारी, दोन अशासकीय सदस्य यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.दोन अशासकीय सदस्य  म्हणून बाजीराव धर्माधिकारी व राजाभाऊ पौळ या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल  त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या