परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

परळी वैजनाथ विधानसभेत मनसे मैदानात!

परळी वैजनाथ विधानसभेत मनसे मैदानात!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना परळी विधानसभा लढविणार - पाथरकर,कळसकर


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      विधानसभा निवडणुकांचे वातावरण जोरदार बापटून विविध पक्षांच्या वतीने या निवडणुकीच्या मैदानात मैदान गाजविण्याची तयारी सुरू आहे यातच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 16 बळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात मनसेच्या वतीने पूर्ण ताकदीनिशिंग उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच परळी मतदार संघाचा विकास करण्यासाठी पक्ष निरिक्षक सलीम मामा ,नरेंद्र तांबोळी,जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी विधासभा मनसे कोणत्याही युती आघाडीत न राहता स्वबळावर लढविणार असल्याचे जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी सांगितले.  

गेल्या अठरा वर्षांपासुन जनतेचे विविध प्रश्न घेऊन मनसे ने आंदोलने केली आहेत प्रसंगी पोलीस केसेसही अंगावर घेतल्या आहेत.नेहमीच जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे रस्त्यावर उतरणारी संघटना म्हणुन लोक मनसे कडे पाहत आहेत. 

त्यामुळे आगामी विधानसभेसाठी मनसे जनतेसमोर सक्षम पर्याय असेल असे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर व शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी पत्रकात सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!