इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

२५ तारखेला होणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?

 २५ तारखेला होणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?


          राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी  बुधवारी मतदान पार पडले. आज शनिवारी २३ तारखेला निकाल जाहीर होत आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक हाती सरकार  येणार आहे. येणाऱ्या २५ नोव्हेंबरला  मुख्यमंत्री पदाचा  शपथविधी होणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. सध्या हाती आलेल्या कलानुसार महायुती २१६ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभेच्या निकालामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे निकालानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. महाराष्ट्राचे चाणाक्य म्हणजेच शरद पवार आहेत. भाजपचा आतापर्यंतचा स्ट्राईक रेट पाहिला तर ८४ टक्के असा आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात भाजपला सलग तिसऱ्यांचा बहुमत मिळाले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१४, २०१९ आणि यंदा २०२४ ला भाजपला रेकॉर्डब्रेक जागा मिळाल्या आहेत. इतकंच नाहीत उद्धव ठाकरे सोबत नसताना दुसऱ्यांदा सरकार आणण्यात फडणवीसांना यश आले आहे. त्यामुळे शिंदेंच्या सरकारमध्ये उमुख्यमंत्रीपदानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या