परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा

 धनराज आदोडे यांची सहाय्यक संशोधन अधिकारीपदी निवड




परळी (प्रतिनिधी)

 परळी शहरातील शारदा नगर भागातील रहिवासी असलेल्या धनराज मारोती आदोडे यांची अर्थ व सांख्यिकी विभाग वतिने घेण्यात आलेल्या परिक्षेत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब(अराजपत्रित)  म्हणुन निवड करण्यात आली असुन त्यांच्याकडे अर्थ व सांख्यिकी विभाग देण्यात आला आहे.धनराज यांच्या या निवडीने परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 परळी शहरातील शारदानगर भागातील रहिवासी मारोती आदोडे यांचे चिरंजीव धनराज आदोडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परळी येथे पुर्ण झाले.महाविद्यालयीन शिक्षणानंतर आदोडे यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली.या परिक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालय मुंबई येथे सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब(अराजपत्रित)म्हणुन नियुक्ती करण्यात आली.त्यांच्याकडे अर्थ व सांख्यिकी विभागाचा कारभार देण्यात आला आहे.सामान्य परिस्थितीतुन आपार मेहनत,जिद्द व चिकाटीने धनराज आदोडे यांनी शिक्षण घेत स्पर्धा परिक्षेची यशाला गवसनी घातली.त्यांचे हे यश परळीतील सामान्य कुटुंबातील शिक्षण घेणार्या व स्पर्धा परिक्षेची  तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे.आदोडे यांच्या या निवडीचे परळीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर व मित्र परिवाराच्या वतिने कौतुक करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार