पहिल्या दिवशी 39 व्यक्तींना 92 नामनिर्देशन पत्रांचे वाटप

 पहिल्या दिवशी 39 व्यक्तींना 92 नामनिर्देशन पत्रांचे वाटप



बीड, दि. 18: 39 बीड लोकसभा मतदारसंघात आज पासून नामनिर्देशन पत्राचे वाटप सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी 39 व्यक्तींनी 92 नामनिर्देशन पत्र घेतले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सूचनेनुसार हे नामनिर्देशन पत्र नि:शुल्क उपलब्ध करून दिले आहेत.

         आज निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे.  आजच ते 25 एप्रिल पर्यंत, 11 ते 3 वाजेपर्यंत  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र वाटप सुरू असणार आहे. 

           जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे  या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांकडून  भरलेले नामनिर्देशन पत्र सर्व कागदपत्रांसह  स्वीकारतील. आज कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाहीत.

        नामनिर्देशन पत्रासोबत शपथ पत्र( नमुना 26 ) हा 25 एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत सादर करने आहे. शपथ पत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथ पत्र सादर करण्याची दिनांक 26 एप्रिल सकाळी 11 वाजे पर्यंत आहे.  याच दिवशी मतदार यादीची प्रमाणित पत्र दाखल करावी लागणार आहे.  फॉर्म ए व फॉर्म बी 25 एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करणे आहे. 


39 बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार