गीता परिवारच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

 गीता परिवारच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       गीता परिवारच्या वतीने परळीत विविध स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले असुन या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
     औद्योगिक वसाहत परळी-वैद्यनाथ येथे दि.१८/४/ २०२४ ला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.गट १ ली ते ४ थी (शुल्कः केवळ १० रुपये) वेळ : दु. ३.३० विषयः हनुमानाचे चित्र रंगवणे.गट ५ वी ते ७ वी (शुल्कः केवळ १० रुपये) वेळ:दु.३.३० विषयः छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढणे व रंगवणे. स्पर्धा : गट ८ वी ते १२ वी(शुल्कः फक्त २५ रुपये) वेळ - दुः ३.३०.विषय : पुठ्यापासून मंदिर बनवणे. (२ x २ फिट) (घरुन बनवून आणणे व मंदिर बद्दल माहिती सांगणे) स्पर्धेचे निकाल दि.२५ एप्रिल २०२४ रोजी जाहीर करण्यात येईल.
     अधिक माहिती व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सौ. श्वेता आशिष काबरा(9422329045), सौ. राजकन्या जगदीश मंत्री(9960705777) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गीता परिवार परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!