प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

पंकजाताई मुंडे २४ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज

 पंकजाताई मुंडे २४ तारखेला दाखल करणार उमेदवारी अर्ज  


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

           भारतीय जनता पक्ष महायुतीच्या बीड लोकसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे या 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

         बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिलेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पंकजा मुंडे यांचा जनसंपर्क, संवाद व प्रचार सभा अखंडितपणे सुरू आहेत. त्यांच्या प्रचाराला बीड जिल्ह्यातील जनतेकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीचे चित्र निर्माण होण्यापूर्वीच उमेदवारी जाहीर होताच एक प्रकारे विजयोत्सव असावा अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यात पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीने जनमानसात मत बिंबवायला सुरुवात झाली होती. उमेदवारी दाखल होण्यापूर्वीच संपूर्ण बीड जिल्हा व प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि बहुतांशी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख गावांना स्वतः उमेदवार असलेल्या पंकजाताई मुंडे या दौरा करून आलेल्या आहेत. एका बाजुला हा प्रचार जिल्ह्यात सुरू असतानाच पंकजाताई मुंडे उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार याची उत्सुकता होती. आता स्वतः पंकजाताई मुंडे यांनी याबाबत माहिती दिली असून 24 एप्रिल रोजी पंकजाताई मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या