इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

पुण्यातील विद्यार्थी संवाद मेळाव्यास तुफान प्रतिसाद

माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव -धनंजय मुंडे

पुण्यातील विद्यार्थी संवाद मेळाव्यास तुफान प्रतिसाद


कॉलेज जीवन व मैत्रीतील अनेक आठवणीना मुंडेंनी दिला उजाळा


पुणे (प्रतिनिधी) - मी ज्याच्यासोबत आहे त्याच्यासोबत इमानदारी दाखवली म्हणून माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव आखला जातं आहे, माझ्या नशिबात संघर्ष पाचवीला पुजला आहे, त्यामुळे तुमच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मी कोणाला घाबरत नाही, तुम्ही साथ द्या, मी तुमच्यासोबत कायम राहील असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुणे येथे बोलताना केले.


पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित विद्यार्थी संवाद मेळाव्यात मुंडे बोलत होते. बीड जिल्ह्यातील आणि परळी मतदार संघातील विद्यार्थ्यांशी यावेळी मुंडे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, या मेळाव्याला पंकजाताई मुंडे देखील येणार होत्या, पण त्या दिल्लीत आहेत, त्यांनी माझ्याजवळ शुभेच्छा संदेश दिला आहे. मी पुण्यात शिकलो असं सांगत मुंडे यांनी पुण्याचं अन माझं एक वेगळं नातं आहे असं म्हटलं.


यावेळी कॉलेज जीवनातील आणि मित्रांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा देत धनंजय मुंडे यांनी मी नेता नसून तुमचा देखील मित्रच आहे, असे समजा म्हणत उपस्थित तरुणांना साद दिली.


माझ्या राजकीय प्रवासात मी अनेक संघर्ष पाहिले. रोज नव्या आव्हानांना तोंड देत मी इथपर्यंत पोहचलो आहे. राजकीय वाटचालीत मला अजितदादा पवार यांनी जी साथ दिली ती कधीही न विसरता येणारी आहे. मी दीड वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून काही लोक मला संपवण्याची भाषा करू लागले आहेत.


माझ्यावर खालच्या पातळीला जाऊन आरोप केले जातं आहेत, माझी जात, माझ्या कुटुंबाचे नाव अगदी माझी लायकी काढली जात आहे. एवढ्या मोठ्या माणसांनी असं बोलण योग्य नाही. पण मी कोणाला भीत नाही, घाबरत नाही. कारण तुमचा अन परळीकरांचा आशीर्वाद सोबत आहे.


पुढच्या काळात बीड जिल्ह्याला विचारात घेतल्याशिवाय राज्याचं राजकारण पूर्ण होणार नाही. स्व. मुंडे साहेबांनी जिल्ह्याचे नाव देशात केलं, त्यांच्याच आशीर्वादाने मी माझ्या पद्धतीने जिल्ह्याचे नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सोबत रहा अन आशीर्वाद द्या असं म्हणत मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी बालगंधर्व रंगमंदिर तरुणाईने हाऊसफुल्ल झालेले पाहायला मिळाले.


व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, समीर चांदेरे, अजय मुंडे, महादेव डोईफोडे, राजपाल लोमटे, विठ्ठल सानप, अविनाश नाईकवाडे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या