कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या गाडीचा आपघात

पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवासादरम्यान गाडीचा आपघात: सौ.राजश्रीवहिनी सुखरुप

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्रीताई  मुंडे यांचा कारचा अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात धडक झाली. राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या मात्र त्या सुखरुप आहेत.

       अपघाताची घटना सोरतापवाडी या ठिकाणी घडली, महामार्गावरून जाताना राजश्रीताई मुंडे यांची कार आणि ट्रॅव्हल बसची  धडक झाली. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.  या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.अपघातानंतर त्यांची प्रकृती तपासून त्यांना काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्या मुंबईला सुख रूप पोहोचल्या आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार