युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

परळीत एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा आज उमेदवारी अर्ज करणार दाखल

 परळीत एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा आज उमेदवारी अर्ज करणार दाखल


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिल्लत (ए.आय.एम.आय.एम) पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा हे 233 परळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.तरी सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन केले आहे. 

        परळी वैजनाथसह महाराष्ट्रात ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिल्लत ए.आय.एम.आय.एम.पक्ष ४३ जागा लढविणार आहेत. परळी मतदारसंघातील पहिल्या उमेद्वारची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये परळीतील एमआयएमचे उमेदवार म्हणून शेख मुस्तफांना संधी देण्यात आली आहे. अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.ख़वी अबबासी साहेब यांनी दिली होती. आदेशानुसार एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा हे सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

    एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा हे परळी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरले आहेत. सर्वसामान्य जनतेतून त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय.  एमआयएम इन्कलाब पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.ख़वी अबबासी साहेब व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परळी विधानसभा मतदारसंघातून एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा हे आपला उमेदवारी अर्ज  दाखल करणार आहेत. तरी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या