युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

सर्वसामान्यांचा उमेद्वार - एमआयएम इन्कलाबचे आव्हान!

 उमेदवारी अर्ज वैध: एमआयएम इन्कलाब पक्षाचे उमेदवार शेख मुस्तफा देणार तगडे आव्हान !


परळी वैजनाथ, प्रतिनिधी... 

      संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष शेख मुस्तफा यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरला आहे.  लक्षवेधी ठरणाऱ्या या मतदारसंघात शेख मुस्तफा हे प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे करणार आहेत. 

        सर्वसामान्य घरातील युवक व  सामाजिक, राजकीय मोठा जनसंपर्क असलेले युवक कार्यकर्ते मुस्तफा मैनुद्दीन  शेख यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून एमआयएम इन्कलाब पक्षाच्यावतीने आपली उमेदवारी दाखल केली. त्यांच्या उमेदवारीला सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सामान्यांचा उमेदवार म्हणून आपण ही निवडणूक लढवत असून लोकशाही पद्धतीने खऱ्या अर्थाने सामान्य जनतेची आपली उमेदवारी असल्याने नक्कीच परळी मतदारसंघातील गोरगरीब, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्यांक, शिक्षित, सुशिक्षित, व्यावसायिक  व्यापारी, छोटे व्यापारी आपल्याला आशीर्वाद देतील असा विश्वास शेख मुस्तफा यांनी व्यक्त केला आहे. आज झालेल्या छाननीत शेख मुस्तफा यांचा अर्ज वैध झाला असून मतदारसंघात त्यांनी जनसंवाद अभियान सुरू केले आहे. घराघरापर्यंत जाऊन आपण सामान्या चा उमेदवार म्हणून आशीर्वाद मागणार असल्याचे शेख मुस्तफा यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या