युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

 परळीतील ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे निधन




परळी (प्रतिनिधी)

 परळीच्या पत्रकारिता क्षेत्रात गेल्या तीन दशकापासून आपल्या लेखणी द्वारे न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रकार तथा कट्टर शिवसैनिक दिलीप बद्दर यांचे मंगळवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता निधन झाले. मृत्युसमयी ते 61 वर्षे वयाचे होते.

 परळी शहरातील सुभाष चौक भागातील रहिवासी असलेले दिलीप बद्दर हे गत तीस वर्षापासून पत्रकारीतेत कार्यरत होते दैनिक सामनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा समाज मनावर उमटवला. याबरोबरच त्यांनी अनेक दैनिकात काम केले. परळी शहरातील कट्टर शिवसैनिक म्हणून ते परिचित होते.आपल्या पत्नी शोभना बद्दर यांना नगरसेविका म्हणुन निवडुन आणत सामाजिक कार्य केले. मागील काही महिन्यापासून ते हृदयरोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर शिर्डी व छत्रपती संभाजी नगर येथे उपचार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान मंगळवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांच्या निधनाने परळीच्या पत्रकारितेची मोठी हानी झाली असून एक निडर व सच्चा पत्रकार गमावल्याने दुःख व्यक्त होत आहे.दिलीप बद्दर यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

परळीत  होणार अंत्यसंस्कार

         दरम्यान कै. दिलीप बद्दर यांच्या पार्थिवावर उद्या गुरूवारी सकाळी 10 वाजता परळी येथील राजस्थानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या