युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:राजेभाऊ फड यांच्या नावाला मतदारांतून मोठी पसंती

ऑटोवालाच होणार परळीचा आमदार!

राजेभाऊ फड यांच्या नावाला मतदारांतून मोठी पसंती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी विधानसभा मतदारसंघाचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. नेहमीपेक्षा यंदाची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीने होऊ घातली आहे. राजकीय पक्षांच्या फुटाफुटीला मतदार नागरिक वैतागले असून ते वेगळ्या पर्यायाचा शोध घेतला जात आहे. युवक नेते राजेभाऊ फड यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. सर्व तयारी पूर्ण झालेली असतांनाही व सक्षम उमेदवार असतानाही पक्षाने त्यांना उमेदवारी न देता ऐनवेळी उमेदवार वेगळाच दिला. मात्र मतदारसंघातील जनतेत राजेभाऊ यांच्याच नावाला मोठी पसंती असल्याचे दिसून येत आहे. राजेभाऊ हे अतिशय साधारण कौटुंबिक परिस्थितीतून पुढे आलेले असून, काहीकाळ त्यांनी शहरात ऑटो चालवला आहे.


परळी विधानसभा मतदारसंघातील यंदाचे चित्र वेगळे दिसून येऊ लागले आहे. पक्षीय समीकरणे बदलली आहेत. निवडून येण्याचे गणित जरी उमेदवार लावू लागले असले तरीही मतदारसंघातील नागरिकांत सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस म्हणून राजेभाऊ फड यांच्या नावाला पसंती असल्याचे दिसून येत आहे. पक्षाने उमेदवारी डावलली असली तरी त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवावी असा जनतेतून आग्रह दिसून येत आहे. राजेभाऊ फड यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सुरुवातीच्या काळात अत्यंत संघर्षाची होती. उमेदीच्या काळात त्यांनी परळी शहरात काहीकाळ ऑटो चालवलेला आहे. मात्र जिद्द, चिकाटी आणि संघर्ष करून त्यांनी उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ कायम जोडलेली आहे. लोकांच्या अडचणीच्या काळात धाऊन जाणारा हक्काचा माणूस अशी त्यांची सर्वत्र प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांनी या विधानसभा निवडणुकीतून माघार न घेता सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जात असल्याने हा ऑटोचालक यंदा आमदार होणारच असा जनतेतून विश्वास व्यक्त केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या