परळीतील ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे निधन: धनंजय मुंडे यांनी केला शोक व्यक्त

 परळीतील ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे  निधन: धनंजय मुंडे यांनी केला शोक व्यक्त

परळी वैजनाथ (दि.30) - परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव बद्दर  यांचे अल्पशा आजाराने छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान निधन झाले असून त्यांच्या अकाली निधनाबद्दल राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. 


दिलीपराव बद्दर हे कायम चेहऱ्यावर हास्य आणि मनात सामाजिक विचार असलेले व्यक्तिमत्व होते. दै. सामना, लोकाशा आदी वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी निर्भीड पत्रकारिता केली. त्यांच्या अकाली निधनाने बद्दर परिवारावर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी स्व.दिलीपराव बद्दर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !