दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

 शाळेतील  खिचडीतून ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा

केज / प्रतिनिधी...

          तालुक्यातील विडा येथील शाळेत ३४ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार झाला असून सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्री. गवळी यांनी दिली.

          विडा येथिल रामकृष्ण विद्यालयात दि. १७ रोजी शालेय पोषण आहार म्हणून खिचडी शिजवली होती.हा पोषण आहार एकूण १३२ विद्यार्थ्यांनी सेवन केला. यामध्ये एकूण ३४ विद्यार्थ्यांना एक तासाने मळमळ, उलट्या, चक्कर येणे, डोकं दुखणे अशा तक्रारी सुरु झाल्या.हा प्रकार विद्यार्थ्यांनी शिक्षकाला सांगितल्या नंतर विद्यार्थ्यांना तात्काळ विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ३४ पैकी २७ विद्यार्थ्यांवर उपचार करून घरी पाठवण्यात आले तर सात विद्यार्थ्यांना केज च्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

       दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी तात्काळ विडा येथील आरोग्य केंद्रात भेट देऊन कर्मचाऱ्यांना सूचना करून योग्य तो उपचार केला. हा प्रकार पालीच्या लेंड्या, व उंदराच्या लेंड्यामुळे झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे अशी विषबाधा होऊ शकते अशी माहिती डॉ. अशोक गवळी यांनी सांगितली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....