युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

बीड जिल्हा बिहार नव्हे साहेब.....सद्गुणांची खाण आहे !

बिहारच्या भाविकाची मोठी रक्कम असलेली हॅन्डबॅग विसरली वैद्यनाथ मंदिरात: सुरक्षारक्षक व पोलिसांच्या सतर्कतेने भाविकाला दिलासा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       बीड जिल्हा बिहार बनल्याचे सवंग व आवाजवी अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. मात्र बोटावर मोजण्या इतक्या दुर्गुणांची रेष मोठी करताना या जिल्ह्यातील सद्गुणांना मात्र दुर्लक्षित केले जात असल्याची खंत बीड जिल्हावाशियांच्या मनात आहे. अशाच प्रकारची चांगुलपणाची खात्री दाखविणारी छोटी पण मोठा अर्थ असलेली बाब वैद्यनाथ मंदिरातील सुरक्षारक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या तत्पर व प्रामाणिक वर्तनातून दिसुन येत आहे.

       बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक येत असतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिरात छोट्या- मोठ्या अनेक घटनाही घडत असतात. याच अनुषंगाने आज  बिहार येथील सुरेंद्र मेहता नावाचे एक भाविक वैद्यनाथ दर्शनासाठी आले होते. वैद्यनाथ मंदिरात बॅगा व साहित्य घेऊन जाण्यास मनाई आहे. परंतु छोटी पर्स किंवा हॅन्डबॅग घेऊन भाविक आत मध्ये प्रवेश करतात. अशाच पद्धतीने हे भाविक वीस हजार रुपये रोख रक्कम व अन्य साहित्य असलेली हॅन्डबॅग घेऊन वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन करतांना बाजूला त्यांनी आपली हॅन्ड बॅग ठेवली होती. मात्र घाई गडबडीत व दर्शनाच्या दरम्यान गाभाऱ्यातून बाहेर जाताना ते ती बॅग विसरून गेले. मंदिराबाहेर गेल्यानंतर बऱ्याच वेळाने आपली हॅन्डबॅग आपल्या सोबत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या बॅगमध्ये सोबत आणलेली प्रवासासाठीची मोठी रक्कम असल्याने ते काळजीत पडले. नेमकं बॅग मंदिर परिसरात कोणत्या ठिकाणी विसरली हेच त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे ते जास्तच चिंतातूर बनले. आपण बॅग कुठे विसरलो याचा शोध घेत असतानाच त्यांना बॅग नेमकी कुठे विसरली हे आठवलेच नाही. 

         दरम्यानच्या कालावधीत गाभाऱ्यांमधील सेवेत असलेल्या मंदिर प्रशासनातील सेवा कर्मचाऱ्याच्या बाब लक्षात आली होती. कोणीतरी बॅग विसरून गेल्याचे लक्षात आल्यानंतर गाभाऱ्यातील सेवेकऱ्याने ही बॅग सुरक्षारक्षक कार्यालयात सुरक्षारक्षक गंगाधर डोणे यांच्याकडे आणून दिली. डोणे यांनी तातडीने वैद्यनाथ मंदिर पोलीस चौकीत कार्यरत स.उपनि राजेभाऊ शेळके यांच्याकडे ही बॅग जमा करून भाविकांचा शोध घेण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर भाविक चौकशी करत करत पोलीस चौकीत आले. त्यावेळी खातरजमा करून व पोलीस चौकीतील रजिस्टरला नोंद करून सहीसलामत या भाविकाला त्याची वीस हजार रुपये रोख रक्कम असलेली हॅन्डबॅग सुपूर्द करण्यात आली. युपी बिहार येथून यात्रा करत इतक्या दूर आलेल्या या चिंतातूर भाविकाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. त्याने पोलीस व मंदिर प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या