इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

सुदर्शन घुले याला न्यायालयीन कोठडी : पोलीस पथक आरोपीला घेवून जिल्हा करागृहाकडे रवाना

केज :- संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी दर्शन घुले याची आज दि. १४ फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडी संपली असून त्याला सीआयडीने केज पोलीस ठाण्यातून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावली नंतर पोलीस पथक आरोपीला घेवून जिल्हा करागृहाकडे रवाना झाले आहे.


बीड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केजचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सुदर्शन घुले याला दि. ११ फेब्रुवारी रोजी सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर यांनी त्याला १२ फेब्रुवारी रोजी केज न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस व्ही पावसकर यांच्या न्यायालयात हजर केले होते. 

प्रथम वर्ग न्यायाधीश एस व्ही पावसकर यांनी सुदर्शन घुले याला दि. १४ फेब्रुवारी पर्यंत सीआयडी कोठडी सुनावली होती. डी आय डी कोठडीत त्याचे व्हॉईस सँपल्स घेण्यात आले असून ते पडताळणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवून दिले आहेत.

त्याची आज दि. १४ फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडी संपत असल्याने त्याची उपजिल्हा रुग्णालय केज येथे तपासणी करून त्याला न्यायालयात हजर केले. क स्तरीय न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांनी त्याला न्यायालयीन सुनावण्यात आली आहे. या वेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड. जितेंद्र शिंदे यांनी काम पाहिले. 

दरम्यान न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत आदेश होताच सीआयडी आणि पोलिसंचे पथक सुदर्शन घुले याला घेवून जिल्हा कारागृहाकडे रवाना झाले आहे. _______________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या