इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

भाजपच्या मंत्र्यांचा प्रत्येक महिन्याला प्रदेश कार्यालयात जनता दरबार

२२ एप्रिलला ना. पंकजा मुंडेंच्या जनता दरबाराने होणार सुरवात

मुंबई।दिनांक १६।

प्रदेश भाजपच्या वतीने प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेण्यात येणार आहे. भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार घेणार असून पहिला जनता दरबार घेण्याचा मान येत्या २२ एप्रिल रोजी राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना मिळाला आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


 प्रदेश भाजपाकडून दर महिन्याला एक दिवस प्रत्येक मंत्रीमहोदयांचा 'जनता दरबार' आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याचा पहिला मान राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना देण्यात आला आहे. येत्या मंगळवारी म्हणजे २२ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ४.३० या दरम्यान भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे त्या जनता दरबार घेणार आहेत. या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील व भागातील संबंधित मंत्रीमहोदयांच्या विभागांतर्गत येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता आपल्या भागातील कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाच्या दोन प्रती घेऊन  २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता प्रदेश कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, शक्य असल्यास कार्यकर्त्यांनी एक आगाऊ निवेदनाची प्रत bjpmaha@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविल्यास त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करणे व ती प्रत त्या विभागाकडे पाठविणे सोयीचे होईल असे प्रदेश कार्यालयाने म्हटले आहे. या जनता दरबारचा राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी लाभ घ्यावा. प्रत्यक्ष उपस्थित राहून मंत्री महोदयांकडून आपल्या भागातील विकासाची कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने जनता दरबारची आपणास मदत होईल, असा विश्वास भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....