इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

मोठ्या संख्येने उपस्थित रहा-जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके

परळीत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हा आढावा बैठकीचे गुरुवारी आयोजन

माजी खा.रामदास तडस यांची राहणार प्रमुख उपस्थिती

परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी)

         येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारी (दि.२४) सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. या बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके यांनी केले आहे. 

                   महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने येथील श्री.शनी मंदिराच्या सभागृहात गुरुवारी जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस, महासचिव डॉ भूषण कर्डिले, (नाशिक), राज्य कोषाध्यक्ष गजानन शेलार, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे उपाध्यक्ष संजय विभुते, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे सहसचिव सुनील चौधरी, प्रदेश सहसचिव जयेश बागडे यांच्या सह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष संगमेश्वर फुटके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राधाताई फकिरे, युवक जिल्हाध्यक्ष संतोष वाघमारे, जिल्हा सचिव प्रा.मधुकर शिंदे, युवक आघाडीचे संभाजीनगर कार्याध्यक्ष अतुल बेंडे, कार्याध्यक्ष प्रा.प्रविण फुटके, सेवा आघाडी संघटक नितीन चौधरी,सेवा आघाडी कार्याध्यक्ष प्रा गणेश परळीकर सह तालुकाध्यक्ष मोहन राजमाने, शहराध्यक्ष राजकुमार भाग्यवंत व  पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या