सौ. सुमनबाई प्रभाकरराव कुलकर्णी धर्मापुरीकर (पुणे) यांचे निधन
परळी वैजनाथ ( प्रतिनिधी) तीस वर्षापासुन परळीत वास्तव्य असलेले सध्या पुणे येथील अरूण प्रभाकर कुलकर्णी यांच्या मातोश्री *सौ. सुमनबाई प्रभाकरराव कुलकर्णी,* धर्मापुरीकर (ह.मु.पुणे) यांचे दि 26 ऑगस्ट मध्यरात्री दोन वाजता निधन झाले सुमनबाई 80 वर्षाच्या होत्या.
गणेशपार भागातील तीस वर्षापासुन राहत असलेले कुलकर्णी कुटूंब आहेत. काही कामानिमित्त सात वर्षापुर्वी पुणे येथे वास्तवात आहेत. परळी शहरातील प्रसिद्ध असलेले त्रिमूर्ती ऑफसेटचे अरूण कुलकर्णी यांच्या त्या आई व नरेश आणि अजित कुलकर्णी(गणेश) यांच्या त्या आज्जी होत्या दिनांक 26 रोजी राञी दोन वाजणयाचा सुमारास निधन झाले.
*सौ. सुमनबाई प्रभाकरराव कुलकर्णी,* धर्मापुरीकर यांच्यावर वैकुंठ धाम, वडगाव स्मशानभूमी, पुणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .
त्यांच्या पश्चात पती मुलगा मुलगी नातु नात असा भरगच्च परीवार आहे . सुमनबाई यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा