इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 "प्रतिक्स मेकअप स्टुडिओ" मध्ये "श्रीं"ची थाटात प्रतिष्ठापणा"




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या येथील "प्रतिक्स मेकअप" येथे आज  "श्रीं"ची स्थापना करण्यात आली. गतवर्षीपासून प्रतिक्स मेकअप मध्ये श्रींची स्थापना करून विविध क्षेत्रातील महिलांना आरतीचा मान दिला जातो.

     प्रेमपन्ना नगरमधील समशेट्टी निवासस्थान येथील प्रतिक्स मेकअप स्टुडिओमध्ये श्रींची स्थापना करण्यात आली आहे. आज गृहिणी ज्योती तुकाराम नरवडे यांच्या शुभहस्ते आकर्षक स्वरूपातील श्रींची स्थापना करण्यात आली तर महावितरण विभागामध्ये नुकतीच निवड झालेल्या गायत्री भागवत डोंगरे व किरण सचिन मिरगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

     प्रारंभी प्रतिक्स मेकअपचे संचालक, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक सुरवसे, ऐश्वर्या ब्युटीपार्लरच्या संचालिका सौ. प्रतिभा सुरवसे यांनी आतिथींचे स्वागत केले. यावेळी दै. महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे, शिवसेनेचे तुकाराम नरवडे, सचिन मिरगे, प्रणव सुरवसे, कु. प्रगती व कुणाल नरवडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या