इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

प्रतिक्स मेकअप"....आपल्या सौंदर्याचा काळजीवाहक

 महावितरणमध्ये निवड झाल्याबद्दल "प्रतिक्स मेकअप"च्या वतीने गायत्री डोंगरे व किरण मिरगे यांचा सत्कार





परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील गायत्री भागवत डोंगरे व किरण सचिन मिरगे या दोघींची नुकतीच महावितरण कंपनीमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ म्हणुन निवड झाली. याबद्दल येथील नामांकित प्रतिक्स मेकअप च्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

     प्रेमपन्ना नगरमधील समशेट्टी निवासस्थान येथील प्रतिक्स मेकअप स्टुडिओमध्ये हा छोटेखानी सत्कार सोहळा संपन्न झाला. प्रतिक्स मेकअपचे संचालक, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक सुरवसे, ऐश्वर्या ब्युटीपार्लरच्या संचालिका सौ. प्रतिभा सुरवसे यांनी किरण मिरगे व गायत्री डोंगरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी दै. महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे, शिवसेनेचे तुकाराम नरवडे, सचिन मिरगे यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या