इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

दुःखद वार्ता....

 परळी शहर पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी श्रीकांत राठोड यांचे निधन




परळी वैद्यनाथ

परळी शहर पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी श्रीकांत छोटूराम राठोड यांचे रक्ताच्या कर्करोगाने  दुःखद निधन झाले. दि. १७ सप्टेंबर २०२५  रोजी सकाळी ८ वा. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत  मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय ३८ वर्षे होते. अतिशय तरुण वयात राठोड यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभाव, हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले श्रीकांत राठोड यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.


      श्रीकांत छोटूराम राठोड हे बीड तालुक्यातील अंतरवन पिंपरीतांडा येथील रहिवासी होते. गेल्या दोन वर्षापासून परळी शहर पोलीस वाहतूक शाखेत ते कार्यरत होते. गेल्या काही महिन्यापासून रक्ताच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले. श्रीकांत राठोड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. श्रीकांत राठोड यांच्या पार्थिव देहावर बीड तालुक्यातील  अंतरवन पिंपरी तांडा येथील स्मशानभूमीत सायं. ६ वा. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चटका लावणारा अंत

परळी शहर पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेत गेल्या दोन वर्षापासून कार्यरत असलेले  पोलीस कर्मचारी श्रीकांत राठोड यांचे अतिशय अल्पावधीत वयाच्या ३८ व्या वर्षी आजाराने दुर्दैवी निधन झाले. यामुळे पोलीस खात्यासह, कुटुंबीय व मित्र परिवारावर एकच शोककळा पसरली आहे. प्रत्येकाच्या जीवाला चटका लागावा असा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या