युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

पत्नीने नको तिकडे मारली लाथ ; पती गेला जीवानिशी ...

पत्नीने नको तिकडे मारली लाथ ; पती गेला जीवानिशी 

  आजकाल आपल्या राज्यात देखील दिवसेंदिवस गुन्हे वाढत चालले आहेत. पत्नी आणि पतीमधील वाद तर आता इतके टोकाला जाऊ लागले आहेत की त्याचा शेवट फार वाईट होताना दिसत आहे. असेच काहीसे अंबाजोगाईमध्ये घडले आहे. पती दारू पिऊन घरी आला. त्यानंतर पती आणि पत्नीमध्ये चांगलाच वाद झाला. पत्नीने रागाच्या भरात पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पण नको तिकडे मार लागल्यामुळे जे घडले त्यामुळे संपूर्ण अंबाजोगाईमध्ये खळबळ माजली.

      अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात घडली. कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर त्याचे पत्नी मायासोबत वाद झाले. मायाने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरच्यांनी व शेजाऱ्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता मायाने हस्तक्षेप करू नका, दररोज हा दारु पिवुन असाच करतो मी याला फुकट सांभाळायचे का? असे म्हणत त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला.नातेवाईकांनी त्याला ऑटोरिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा समज होता. मात्र दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. कैलासची बहिण ज्योती तरकसेने पोलिसात जाऊन वहिनीविरोधात तक्रार दाखल केली.

सात वर्षांपूर्वी झाले होते लग्न

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, कैलास सरवदे याचे लग्न सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी झाले होते. माया हिचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुली तर कैलासपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कैलास हा शरीराने अपंग आणि दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याच्यात व माया यांच्यात नेहमी वाद होत असत. माया ही कैलास याला नेहमी उपाशी ठेवत असे. कैलास याची पत्नी माया सरवदे हिने जाणूनबुजून पतीवर घातक मारहाण करून त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सरवदे हिच्यावर बीएनएस कलम105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या