युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

GR निघाला: ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा होणार....

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता 1500 रुपये कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर




नुकतेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा (Namo Shetkari Yojana) सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला आहे. आता लाडक्या बहिणींना त्यांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता (Ladki Bahin scheme August installment) कधी मिळणार याची आस लागली आहे.


गेल्या काही दिवसांपासून ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता पहिला आठवडा उलटला तरी महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु याबाबत आता हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याबाबतचा जीआर सरकारकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होईल.


जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमच्या बँक खात्यात अद्याप आर्थिक मदत जमा झाली नसेल, तर खालील पद्धतींचा अवलंब करा.

• पात्रता तपासा - तुमची अर्ज केलेली माहिती योग्य आहे आणि तुम्ही या योजनेच्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करत आहात, याची खात्री करा. माहितीतील काही त्रुटी असल्यास अर्ज प्रक्रियेत विलंब होऊ शकतो. 

• बँक खाते पडताळणी - अर्ज प्रक्रियेदरम्यान दिलेली बँक खाते माहिती योग्य आहे आणि खाते सक्रिय आहे, याची खात्री करा. खाते क्रमांक किंवा IFSC कोडमध्ये चुकीमुळे पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो

• हेल्पलाईनवर करा संपर्क: हेल्पलाईन - योजनेच्या हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक 181 वर संपर्क साधा. हेल्पलाईन कर्मचारी तुमच्या अर्जाची स्थिती तपासून पुढील काय करायचे याबाबत मार्गदर्शन करतील.

• सूचनांवर लक्ष ठेवा - स्थानिक बातम्या किंवा राज्य सरकारच्या सूचनांवर लक्ष ठेवा, कारण ते योजनेबद्दल अधिक माहिती देऊ शकतात, विशेषत: प्रलंबित रक्कम कधी आणि कशी जमा केली जाईल याबद्दल.

• स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा - तुमच्या परिसरातील महिला व बालविकास (WCD) कार्यालयाशी किंवा योजनेचे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. ते तुमच्या अर्जाची स्थितीबद्दल माहिती देऊ शकतात.

• अधिकृत वेबसाइटला भेट द्या - महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलला भेट द्या. तिथे देण्यात आलेल्या अद्यतने आणि सूचना तपासा.


लाडकी बहिण योजनेचे निकष (Ladki Bahin Scheme Criteria) 


•लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.

•दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे 

•ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.

•अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.

•लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.

•नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.

लाडकी बहिण योजनेचे निकष (Ladki Bahin Scheme Criteria) 

• लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.

•दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे 

•ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.

•अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.

•लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.

•नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.

•अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.

•अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.

•नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.

•लाडकी बहीण योजनेतून महिला


 अपात्र होण्याची कारणे (Reasons for Ladki Bahin Yojana Ineligible)

•लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

•ज्या महिला 21 ते 65 वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो. 

• लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख असायला हवे.

• लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात. 

• लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.

• लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत.

• जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. 

• अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या