परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 पुण्य कर्म करण्याकरिता मन शुद्ध पाहिजे- पुज्य भीक्खुनी प्रा.धम्मदर्शना महाथेरी

बीड( प्रतिनिधी) आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा ह्या तीन महिन्याच्या वर्षाकाळात अडीच हजार वर्षापासून भिक्खु संघ तत्कालीन विहारात राहून विद्यार्जन करीत असत व तथागता कडून मिळालेला उपदेश त्या परिसरातील उपासक उपासिकांना समजावून सांगत असतं. तथागतांचा सर्व अनमोल उपदेश पाली भाषेतून आहे. तो सर्व सामान्यांना समजावा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष तथागतांच्या उपदेशांचा सखोल अभ्यास केला व बोधिसत्व बाबासाहेबांनी शेवटचा ग्रंथ दि. बुद्धा अँड हीज धम्मा इंग्रजीतुन लिहिला सर्व भारतीयांना समजावा म्हणून डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांनी हिंदीमध्ये त्या  ग्रंथाचा अनुवाद केला. नंतर पी ई एस सोसायटीने त्या ग्रंथाचा मराठीत बुद्ध आणि त्यांचा धम्म असा अनुवाद केला. हाच धम्मग्रंथ तथागतांचा उपदेश  समजून घेण्या करिता व जगात प्रज्ञा,शील, करुणा मैत्री, बंधूता व न्यायाची निर्मिती होण्याकरता व त्यानुसार आपण आपली आचरण ठेवण्याकरता वर्षावास काळात सामुदायिक वाचन अनेक विहारात केल्या जाते. या तीन महिन्यानंतर त्या ग्रंथ वाचनाचा सांगता समारोप पूज्य भिक्खूंच्या देशानेने केला जातो हाच मार्ग स्वीकारून सांची बुद्ध विहार अंकुश नगर बीड येथे सांगता समारोप प्रसंगी पुज्य प्राध्यापक भीक्खुनी धम्मदर्शनी महाथेरी भीम टेकडी छत्रपती संभाजी नगर यांची धम्मदेशना संपन्न झाली. त्या मंत्रमुग्ध करणाऱ्या धम्मदेसनेत  आपल्या मधुर आवाजात उपदेश करताना सर्व बालक-बालिका उपासक उपासिका समजेल अशा भाषेत सांगितले की पुण्य कर्म करण्याकरता मन शुद्ध पाहिजे. मनातील शुद्ध विचारच पुण्यकार्य करण्याकरता प्रवृत्त करतात जोपर्यंत आपण ज्ञानार्जन करीत नाही तोपर्यंत अविद्याने आपल्या जीवनात केलेला अंधार नष्ट होत नाही. तथागताच्या उद्दिष्टाचा मार्ग हा मध्यम मार्ग आहे अंधारातून प्रकाशाकडे. प्रकाशाकडून अति उच्च प्रकाशाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून, अंधश्रद्धा राग लोभ मोह मत्सर या दुर्गुनापासून दूर राहून प्रज्ञा, शील, करुणा,मैत्री, त्रिशरण पंचशील अष्टांगिक मार्ग व 10पारमितेचे पालन केल्यानंतर जगात स्वातंत्र्य, शांती,बंधुता,न्याय प्रस्थापित होण्यास बहुमोल सहाय्य होऊ शकते व हे जग जे विज्ञानाच्या शोधाने अणुशस्त्र सज्ज आहे ज्या आधारे केव्हाही नष्ट होऊ शकते.ते जर टाळावयाचे असेल तर जगाला आज युद्ध नको तर बुद्ध हवा आहे हे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. सील सदाचाराच्या वर्तनातून कुशल कर्म घडते व त्यातून पुण्य मिळते. पुण्य विकत घेता येत नाही व मोजताही येत नाही किंवा चोरी हि करता येत नाही परंतु त्या कुशल कर्माचे पुण्यकर्माचे परिणाम मात्र नक्की कसे दिसतात हे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. भगवान बुद्धांनी सांगितले आहे की माणसाचा जन्म हा अनमोल देन आहे. ज्याला जन्म आहे. त्याला मृत्यू आहे. तेव्हा जन्माला जसा आनंद मानतो तसेच मुर्त्यूला देखील आनंदाचा एक सोहळा मानावा. मृत्यूनंतर आपण केलेल्या कुशल कर्माचीच आठवण मागे राहते.जगात सर्वात मोठा आशीर्वाद देणारे आई- वडीलच असतात. म्हणून त्यांची सेवा करा व पुण्यकर्म करून दुःखातून मुक्त व्हा. पालकांना स्पष्ट जाणीव करून दिली की मुलांना उच्च शिक्षण द्या पण त्याबरोबरच त्यांच्यावर लहानपणापासूनच सुसंस्काराची करा. म्हणजे ती तरुणपणी व्यसनापासून दूर राहतील व त्रिशरण पंचशील अष्टांग मार्ग दहा पारमिता पूर्णपणे समजावून घेऊन त्याप्रमाणे आपल्या जीवनातील आचरण ठेवतील. तरच त्यांच्या करता संपत्ती कमावण्याच्या कामापेक्षा संतती घडविण्याचे कुशल कर्म आपल्या हातून घडेल. असे समजता येईल त्याकरता डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दर रविवारी आपल्या कुटुंबासह विहारात येऊन धम्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, आपल्या कमाईतील विसावा भाग समाजाकरता खर्च करा.  याबद्दल चर्चा व विचार विनिमय करता येईल व विहारे ही संस्कार केंद्र कशी व्हावी याबद्दल सांगोपांग विचार विनिमय होऊन समाज उपयोगी कार्य करण्याचे आयोजन करता येईल. हे सर्वांनी मिळून कसे अमलात आणता येईल एकमेकांच्या सहवासातून ठरवता येईल हे आणि असे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.जालिंदर माने यांनी केले तर प्रास्ताविक आयु ॲड.राजेश वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापक किशोर वाघमारे यांनी व्यक्त केले. महिला उपासक उपासिकांनी कार्यक्रमा यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले. कार्यक्रमास बीड शहरातील अंकुश नगर परिसरातील बहुसंख्य उपासक उपासिका बालक,बालिका विहार कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते . सरणात्तयने व खीरदान,भोजनदान करून कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!